प्रचाराच्या तोफा थंडावल्याचं पाहायला मिळालं. प्रचार संपल्यानंतर पंतप्रधान मोदी ३० मे रोजी संध्याकाळी कन्याकुमारी येथे पोहोचले. कन्याकुमारी येथील विवेकानंद रॉक मेमोरियलच्या ध्यान मंडपममध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे ४५ तासांचे ध्यान सुरू झाले आहे. 45 तास अन्नाच्या कणालाही शिवणार नाहीयेत. 1892 मध्ये स्वामी विवेकानंद यांनी जिथे ध्यान केले त्याच ठिकाणी मोदी ध्यान करत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे ध्यानधारणेचे फोटो समोर आले, त्याच्या बातम्याही यायला लागल्यात..पण यावर विरोधकांकडून टीका सुरु झाली आहे, विरोधकांचा आरोप आहे कि, आचारसंहिता चालू असताना नरेंद्र मोदींचा ध्यानधारणेचा कार्यक्रम हा एक पॉलिटिकल स्टंट आहे. या टिकेमुळं खरंच मोदींनी आचारसंहितेचं उल्लंघन केलं आहे का याबाबत आपण माहिती घेणार आहोतच सोबतच पंतप्रधान मोदींनी ध्यानधारणेसाठी कन्याकुमारीचीच निवड केली ? मोदींच्या ध्यानधारणेचा निवडणुकीवर किंवा दक्षिण भारतात काय परिणाम होऊ शकतो ? आणि या ठिकाणाचं आणि महाराष्ट्राचं काय कनेक्शन आहे ? हेच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.