Lagavbatti

day, 00 month 0000

वाचाल तर कळेल!

PM नरेंद्र मोदी यांच्या खांद्याला खांदा लावून काम करणारे ‘ते’ 72 जण कोण, कोणत्या पक्षाचे?

Narendra modi 72 Ministers name

नरेंद्र मोदी यांनी सलग तिसऱ्यांदा भारताच्या पंतप्रधानपदाची शपथ घेतली. PM नरेंद्र मोदी यांच्यासोबत तब्बल ७२ खासदारांनीही मंत्रीपदाच्या गोपनीयतेची शपथ घेतली. या ७२ मंत्र्‍यांमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सोशल इंजिनिअरिंग दिसून आली.

PM नरेंद्र मोदी यांच्यासोबत असलेले सर्वाधिक म्हणजेच १० मंत्री हे उत्तरप्रदेशातून निवडून आलेले आहेत. पंतप्रधान मोदीही त्यातलेच एक. मंत्रिमंडळात बिहार दुसऱ्या नंबरवर आहे. बिहारला तब्बल आठ मंत्रीपदे मिळाली आहेत, तर महाराष्ट्रातील ६ जणांना मोदींच्या मंत्रीमंडळात स्थान देण्यात आलंय. मध्य प्रदेशला पाच, गुजरातला अमित शाहांसह इतर तिघांना, राजस्थानमध्ये चौघांना, कर्नाटकमध्ये चार, ओडिसा, हरियाणा, झारखंड आणि आंध्र प्रदेशला प्रत्येक तीन मंत्रीपदं, तेलंगणा, पश्चिम बंगाल, आसाम, पंजाब या राज्यांना प्रत्येकी २ मंत्रीपदं मिळाली आहेत. केरळ, छत्तीसगड, दिल्ली, तामिळनाडू, गोवा, उत्तराखंड, अरुणाचल प्रदेश, हिमाचल प्रदेश आणि जम्मू-काश्मीर या राज्यांना प्रत्येकी एक मंत्रीपद देण्यात आलं आहे.

आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कॅबिनेटमध्ये कोणाचा सहभाग आहे, हेही समजून घ्या.

नरेंद्र मोदी – पंतप्रधान

कॅबिनेट मंत्री

१. राजनाथ सिंह(भाजप)
२. अमित शाह (भाजप)
३. नितीन गडकरी (भाजप)
४. जगतप्रकाश नड्डा (भाजप)
५. शिवराजसिंह चौहान (भाजप)
६. निर्मला सीतारामन (भाजप)
७. डॉ. सुब्रमण्यम जयशंकर (भाजप)
८. मनोहर लाल (भाजप)
९. एच. डी. देवेगौडा (जेडीएस)
१०. पियूष गोयल (भाजप)
११. धर्मेंद्र प्रधान (भाजप)
१२. जितनराम मांझी (हम)
१३. राजीव रंजन सिंह उर्फ ललन सिंह (जदयु)
१४. सर्वानंद सोनोवाल (भाजप)
१५. डॉ. वीरेंद्र कुमार (भाजप)
१६. किंजरापुर राममोहन नायडू (तेलुगू देसम पार्टी)
१७. प्रल्हाद जोशी (भाजप)
१८. जुएल ओराम (भाजप)
१९. गिरीराज सिंह (भाजप)
२०. अश्विनी वैष्णव (भाजप)
२१. ज्योतिरादित्य सिंदिया (भाजप)
२२. भूपेंद्र यादव (भाजप)
२३. गजेंद्रसिंह शेखावत (भाजप)
२४. अन्नपूर्णा देवी (भाजप)
२५. किरेन रिजिजू (भाजप)
२६. हरदीप सिंग पुरी (भाजप)
२७. डॉ. मनसुख मांडविया (भाजप)
२८. जी. किशन रेड्डी (भाजप)
२९. चिराग पासवान (लोजपा)
३०. सी. आर. पाटील (भाजप)

राज्यमंत्री – स्वतंत्र प्रभार

१. राव इंद्रजित सिंह (भाजप)
२. डॉ. जितेंद्र सिंह (भाजप)
३. अर्जुन राम मेघवाल (भाजप)
४. प्रतापराव जाधव (शिवसेना)
५. जयंत चौधरी (राष्ट्रीय लोकदल)

राज्यमंत्री

१. जितिन प्रसाद (भाजप)
२. श्रीपाद नाईक (भाजप)
३. पंकज चौधरी (भाजप)
४. रामदास आठवले (रिपाई-A)
५. रामनाथ ठाकुर (जदयु)
६. नित्यानंद राय (भाजप)
७. अनुप्रिया पटेल (अपना दल)
८. व्ही सोमन्ना (भाजप)
९. डॉ. चंद्रशेखर पेम्मासनी (तेलुगू देशम)
१०. प्रा. एसपी सिंह बघेल (भाजप)
११. शोभा करंदलाजे (भाजप)
१२. कीर्तीवर्धन सिंह (भाजप)
१३. बी. एल. वर्मा (भाजप)
१४. शांतनू ठाकुर (भाजप)
१५. सुरेश गोपी (भाजप)
१६. डॉ. एल. मुरुगन (भाजप)
१७. अजय तम्टा (भाजप)
१८. बंडी संजय कुमार (भाजप)
१९. कमलेश पासवान (भाजप)
२०. भगीरथ चौधरी (भाजप)
२१. सतीशचंद्र दुबे (भाजप)
२२. व्ही. संजय सेठ (भाजप)
२३. रवनीत सिंग (भाजप)
२४. दुर्गादास उईके (भाजप)
२५. रक्षा खडसे (भाजप)
२६. सुकांता मुजुमदार (भाजप)
२७. सावित्री ठाकुर (भाजप)
२८. तोखन साहू (भाजप)
२९. राजभूषण चौधरी (व्हीआयपी)
३०. भूपती राजू श्रीनिवास वर्मा (भाजप)
३१. हर्ष मल्होत्रा (भाजप)
३२. निमुबेन भांबनिया (भाजप)
३३. मुरलीधर मोहोळ (भाजप)
३४. जॉर्ज कुरियन (भाजप)
३५. पवित्र मार्गारिटा (भाजप)

Scroll to Top