लोकसभा निकाल लागले. ४०० पारचा नारा लावणाऱ्या भाजपचे ३०० पारही झाले नाही. भाजपला २४० जागा मिळाल्या आहेत. बहुमताच्या आकड्यापेक्षा ही संख्या ३२ ने कमी आहे. भाजपला बहुमत मिळू शकले नसले तरी नरेंद्र मोदी पंतप्रधान होणार आहेत. कारण एनडीएने २९३ जागांसह बहुमताचा आकडा पार केला. एनडीएकडे भाजपशिवाय १४ मित्रपक्षांचे ५३ खासदार आहेत.. आता देशात एनडीएचं सरकार बनणार आहे. एकाही पक्षाने पाठिंबा काढून टाकला तर भाजपही सत्तेत राहणार नाही अशी परिस्थती बनली आहे. त्यामुळं भाजपला सर्वात महत्वाचे ठरलेत ते टीडीपी, जेडीयू, शिवसेना आणि राष्ट्रवादी. आता एकट्या भाजपचं काहीच चालणार नाही, घटक पक्षाच्या समर्थनाच्या बदल्यात त्या पक्षाला जास्त संख्येची मंत्रिपदं द्यावी लागणार आहेत.
टीडीपी, जेडीयू खालोखाल महाराष्ट्रातील शिंदेंच्या सेनेचंही पाठबळ भाजपला महत्वाचं आहे. इकडे अजित पवारांचे एकमेव खासदार निवडून आले असले तरीही त्यांच्याही पक्षाला एल मंत्रिपद मिळणार असल्याचं समजतंय त्यामुळं महाराष्ट्रात किती मंत्रिपदं येतील… ५ खासदारांमागे १ मंत्रीपद या सूत्राप्रमाणे केंद्रात मंत्रिमंडळ विस्तार कसा होईल ? कुणाला कोणती खाती मिळतील ? जाणून घेण्यासाठी सविस्तर व्हिडीओ नक्की पाहा.
संपूर्ण व्हिडीओ लिंक :