मनोज जरांगे पाटील हे नाव आता महाराष्ट्रात घरोघरी पोहचलं आहे. त्याच कारण म्हणजे मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून जरांगे पाटील यांनी केलेलं आंदोलन असो की मग आरक्षणासाठी उपोषणाला बसणं असो. लोकसभा निवडणुकीपूर्वी महाराष्ट्रात फक्त एकच नाव चर्चेत होत ते म्हणजे मनोज जरांगे पाटील. पण त्यानंतर लोकसभा निवडणूक लागल्या आणि जरांगे हे नाव निवडणुकीच्या धामधुमीत बाजूला झालं. पण तरी चर्चेत होता तो “जरांगे फॅक्टर”. अनेक लोकसभा मतदारसंघात मराठा समाज मनोज जरांगे पाटील यांच्या मागे उभा असल्याचं दिसून आलं. निवडणुकीपूर्वी ” मराठ्यांना ज्यांना पाडायचं आहे त्याला मराठयांनी पाडाव “असं विधान जरांगेंनी केलं होत. त्यामुळे बऱ्याच मतदारसंघात त्याचे पडसाद सुद्धा पाहायला मिळाले मग त्यात बीड असो की जालना किंवा परभणी असो , सर्वत्र चर्चा होती “जरांगे फॅक्टरची”. त्यातचं बीड मध्ये तर जरांगे यांच्यावर गुन्हा देखील दाखल झाला होता. बैठकांमध्ये जरांगे-पाटील यांनी नियमांचे उल्लंघन करणे, प्रक्षोभक भाषण करणे, खोटी माहिती प्रसारीत केल्याचा आरोप करत त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले होते. पण आता २०१३ सालच्या एका प्रकरणामुळे जरांगे यांच्या अडचणी वाढल्या आहेत. ३० मे ला कोर्टाने जरांगे पाटील यांना अजामीनपात्र नोटीस देऊन, कोर्टात हजार राहण्याचे आदेश दिले. या प्रकरणात जरांगे पाटील कोर्टात हजर देखील राहिले .आता हे प्रकरण नेमकं काय आहे ? यामुळे जरांगे पाटील कसे अडचणीत आले ? आणि कोर्टाने जरांगे पाटील यांना दंड का ठोठावला ? हे सगळं आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहुयात.