लोकसभा निवडणूक झाली की त्यामध्ये असलेल्या अनेक महत्त्वाच्या गोष्टींवर लक्ष देणं गरजेचं आहे, कारण त्यावरुन जनतेने दिलेला कौल काय असू शकतो, त्यांचा अंदाज लावणं सोप्प जातं. महाराष्ट्रातल्या जनतेने दिलेला कौल पाहिला तर महायुती १७, महाविकास आघाडी ३० आणि अपक्ष एक अशी लोकसभा २०२४ मध्ये निवडूक आलेल्या खासदारांची संख्या आहे. ४५ प्लसचा नारा दिल्यानंतर त्याच्या आजूबाजूलाही पोहचण्यात महायुतीला यश मिळालं नाही, मात्र महाविकास आघाडीने ३० जागांवर मजल मारली. ही मोठी आणि चर्चेतली गोष्ट ठरली. आता या सगळ्यात अजून एक चर्चेतली गोष्ट आहे ती म्हणजे विद्यमान खासदारांचा झालेला पराभव. महाराष्ट्रात तब्बल २० असे विद्यमान खासदार होते, ज्यांना आपलं यश राखून ठेवता आलं नाही. आता त्या जागा कोणत्या आहेत, तिथल्या लढाया कशा झाल्या आणि विरोधात कोण होतं, ही माहिती समजून घेण्यासाठी खालील व्हिडीओ संपूर्ण पाहा…
संपूर्ण व्हिडीओ :