लोकसभा २०२४ च्या निकालानंतर आता राजकारणात अजून वेगवेगळ्या घडामोडी सुरु झाल्या आहेत. २०१९ मध्ये जस चित्र होत त्यापेक्षा बरच वेगळ चित्र यंदाच्या निकालात दिसून आले आहे. निवडणुकीआधी महाराष्ट्रात बऱ्याच घडामोडी झाल्या. लोकसभेच्या तोंडावरच काही नेत्यांनी पक्षांतरं केली. हे सगळं कशासाठी झालं, तर लोकसभेच्या उमेदवारीसाठी. अनेक ठिकाणी नव्या उमेदवारांना संधी मिळाली, तर काही ठिकाणी जुन्याच चेहऱ्यांना संधी देण्यात आली. पण या सगळ्यात चर्चा झाली ती घराणेशाहीतून समोर आलेल्या उमेदवारांबद्दल. महाराष्ट्रातल्या ४८ उमेदवारांपैकी जवळपास २० उमेदवार हे घराणेशाहीतून दिलेले होते. घराणेशाहीतून उभे असणारे उमेदवार जिंकले का? त्या मतदारसंघात पुढे काय झालं? घराणेशाहीतून पुढे आलेल्या किती उमेदवारांना जनतेने पसंती दिली? किती उमेदवारांनी बाजी मारली? कितीजणांचा पराभव झाला? हेच आपण या व्हिडीओच्या माध्यमातून समजून घेणार आहोत.
Home » कारभार लोकसभेचा » Loksabha Winning Candidates: या निवडणुकीत घराणेशाहीतून आलेल्या किती उमेदवारांचा पराभव झाला?