भाग्यश्री सूर्यकांत सुडे. वय 22 वर्ष…राहणार वाघोली पुणे. भाग्यश्री ३० मार्चच्या रात्री नऊच्या सुमारास नगररोड वरच्या फिनिक्स मॉलमध्ये गेलेली. तिथून ती बेपत्ता झाली.. कुठे गेली माहित नव्हतं. २ तारखेला भाग्यश्रीच्या वडिलांच्या मोबाईलवर खंडणीसाठी एक मेसेज आला. ९ लाख रुपये द्या..नाही दिले तर तुमच्या मुलीला मारून टाकू…आधीच मुलीशी संपर्क होत नव्हता त्यात खंडणीसाठी मॅसेज आलेला. घाबरलेल्या आई वडिलांनी पुणे गाठलं, विमाननगर पोलिसात तक्रार केली. पोलिसांनी शोध सुरु केला. भाग्यश्री मिळाली पण ती जिवंत नव्हती….तपासानंतर समोर आलं कि, भाग्यश्रीचा तिच्याच मित्रांनी खंडणीसाठी खून केला.. तिला मारण्याआधीच तिच्यासाठी पुणे-नगर हायवेवरील कामरगाव गावच्या हद्दीतील मोकळ्या जागेत खड्डा खोदला. CID बघून त्या मित्रांनी अगदी थंड डोक्याने भाग्यश्रीच्या खुनाचा प्लॅन आखला. तिला मारून तिचा चेहरा विद्रुप केला. हा सगळा प्रकार ३० मार्च रोजी घडला. घडलेला हा प्रकार ७ दिवसांनी ७ एप्रिलला बाहेर आला, भाग्यश्रीसोबत काय घडलं होतं? ही संपूर्ण केस काय आहे?