आज मी माझा जिवलग मित्र गमावला. ब्रँडन, तुझी सर्जनशीलता, विलक्षण प्रतिभा आणि निःस्वार्थ प्रेम याचं नेहमी कौतुक राहिलं; पण आज तू जगात नाहीये. हे वाक्य आहे डॅन रामेकर्स याचं. रामेकर्स याचा मित्र ब्रँडन यंग याचं 17 मे रोजी निधन झालं. उच्च रक्तदाबामुळे झालेल्या आलेल्या स्ट्रोकमध्ये ब्रँडन यंग याचे वयाच्या ३९ व्या वर्षीच निधन झाले. ब्रँडन यंग हा अमेरिकेतल्या मॅरिकोपा काउंटीमधल्या मेसा या शहरातला रहिवाशी.
ब्रँडन यंग याच्या निधनानंतर त्याच्या अंतिम विधीसाठी मित्रपरिवार आणि पाहुण्यांनीही त्याच्या घरी हजेरी लावली, ठरल्याप्रमाणे सर्व सोपोस्कार झाले आणि प्रत्येकजण आपआपल्या घरी गेला. त्याच्या काही दिवसांनी ब्रँडन यंग याच्या पत्नीचा मीत्रपरिवार आणि पैपाहुण्यांना एक मेसेज आला. त्या मेसेजमध्ये त्यांना स्नेह भोजनाचं आमंत्रण देण्यात आलं होतं. ब्रँडन यंग याची पत्नी केटी यंग हिचा मेसेज वाचून सर्वांना आश्चर्याचा धक्का बसला. सगळ्यांना यामागचं कारण जाणून घेण्याची उत्सुकता होती. त्यामुळे ज्यांना ज्यांना आमंत्रण आलं होतं, अशा ५०० जणांनी ब्रँडन यंगच्या घरी हजेरी लावली.
ब्रँडनच्या मृत्यूनंतर केटीने आपल्या घरीच 500 जणांसाठी जेवणाची व्यवस्था केली. पाहुणे जेवण करुन परतत असताना केटीने त्यांना रिटर्न गिफ्ट्सही दिले आणि आपल्या या कार्यक्रमात सहभागी झाल्याबद्दल आभार माणले. या सगळ्या कार्यक्रमामागे केटी यंगची भावना काय होती, हे अनेक माध्यमांनी जाणून घेण्याचा प्रयत्न केला, त्यावर केटी म्हणाली…
जेव्हा आपल्या आयुष्यातील विशेष व्यक्तीचा मृत्यू होतो, तेव्हा ते दु:ख सहन करण्याच्या पलीकडे असतं. ते दु:ख विसरण्यासाठी अनेक महिने जातात. त्यातच माझ्यावर माझ्या तीन मुलांची जबाबदारी आहे. मला जास्तवेळ दु:खात राहून चालणार नाही. १२ वर्षीय एलेनॉर यंग, १० वर्षीय क्लाइड यंग आणि ८ वर्षीय इंग्रिड यंग या तिघांचा सांभळ मला करायचं आहे, मी दु:खी आहे किंवा खचलेली आहे, हे मला माझ्या मुलांना दाखवून द्यायचं नाही, त्यामुळेच मोठ्या दु:खातून बाहेर पडण्यासाठी मी या स्नेहभोजनाचं आयोजन केलं, असं केटीने माध्यमांना सांगितलं.