लोकसभा निवडणुकीने राज्यात धुमाकूळ घातला होता. अखेर २० मे रोजी महाराष्ट्रातील निवडणुकीचा शेवटचा म्हणजेच पाचवा टप्पा पार पडला. या टप्प्यात १३ लोकसभा मतदारसंघात मतदान पार पडलं. या पैकी एकनाथ शिंदे यांचा बालेकिल्ले समजल्या जाणाऱ्या मतदारसंघात नेमकं काय होऊ शकतं, याकडे सगळ्यांची नजर लागून आहे, ते मतदारसंघ म्हणजे ठाणे आणि कल्याण लोकसभा मतदारसंघ. ठाणे लोकसभेत ठाकरेंच्या शिवसेनेचे राजन विचारे विरुद्ध शिंदेंच्या शिवसेनेचे नरेश म्हस्के मैदानात आहे. तर कल्याण लोकसभेत शिंदेंच्या शिवसेनेकडून श्रीकांत शिंदे विरुद्ध ठाकरेंच्या सेनेकडून वैशाली दरेकर असा सामना होत आहेत. आता या दोन जागांवर नेमकी परिस्थिती काय आहे, कोणत्या ठिकाणी कोणाचा पारडं जड आहे, कोण कुठे कमी पडलं, हेच आपण या व्हिडीओच्या माध्यमातून पाहणार आहोत.