तुमचे खासदार किती जिंकून येतील, असा प्रश्न जेव्हा तुम्ही महायुतीच्या कार्यकर्त्यांना विचारता तेव्हा ते ४० वर येतील असं उत्तर देतात, तोच प्रश्न महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांना विचारता तेव्हा ते ३० ते ३५ दरम्यानचा आकडा सांगतात. आता दोन्ही कार्यकर्त्यांनी आपले आकडे सांगितले असले तरी देशपातळीवरही असंच काहीसं चित्र निर्माण झालं आहे. त्याचं कारण आहे, काँग्रेसने दिल्लीत बोलवलेली इंडिया आघाडीची बैठक. लोकसभा निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्याचं मतदान 1 जून रोजी पूर्ण होतंय आणि त्याच दिवशी काँग्रेसने पुढाकार घेत INDIA च्या सर्व घटक पक्षांची बैठक बोलवली आहे. आता त्या बैठकीत कोणकोण हजेरी लावणार? बैठकीमध्ये इंडिया आघाडीच्या पंतप्रधानपदाचा चेहरा ठरवला जाणार का? शेवटच्या टप्प्यात देशातील 57 लोकसभा मतदारसंघात मतदान होत असताना त्याच दिवशी इंडिया आघाडीच्या बैठकीचं कारण काय असू शकतं? हेच मुद्धे समजून घेण्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा.