अभिनेता सलमान खानच्या वांद्रे येथील गॅलेक्सी घराबाहेर गोळीबार झाला. हा गोळीबार झाला एका जुन्या रागातून. १९९८ मध्ये सलमान खानच्या ‘हम साथ साथ है’ या चित्रपटाचं शूटिंग राजस्थानमध्ये सुरु होतं, या शुंटिंग दरम्यान सलमान खान आणि इतर कलाकार हे राजस्थानमध्ये शिकारीसाठी गेले होते. त्यावेळी त्यांनी दोन काळवीटांची शिकार केली. याच प्रकरणात सलमान खानसह इतर कलाकारांवर गुन्हे दाखल आहेत. याच गोष्टीचा बदला घेण्यासाठी राजस्थानमधली बिश्नोई गँग सलमानवर नजर ठेऊन आहे.
राजस्थानमधील बिष्णोई समाजात या काळवीटाच्या म्हणजेच काळ्या हरणाला पवीत्र मानले जाते. या बिष्णोई समाजातील लोकांचे या काळवीटासोबत भावनिक नातं आहे, याच काळवीटाला मारल्याने सलमान खानवर बिश्नोई गँगचा विशेष राग आहे.