IPL 2024 च्या फायनल मॅचनंतर चर्चा सुरु झाली ती गौतम गंभीरची. तोच गंभीर ज्याने या आधी केकेआरला दोनवेळा ट्रॉफी मिळवून दिली होती. जेव्हा गंभीरने केकेआरला सोडलं, तेव्हा केकेआरलाही आयपीएलमध्ये यश मिळवता आलं नव्हतं. यावर्षी मात्र मैदानाच्या बाहेरून सूत्र हलवत तब्बल दहा वर्षांनी केकेआरच्या पदरात ट्रॉफी टाकली आहे. आता केकेआर जिंकण्यामागं गंभीर आणि त्याचं नियोजन असल्याचं का म्हटलं जातंय? केकेआरला विजेतेपदं जिंकण्यासाठी १० वर्ष का लागले? आणि मिचेल स्टार्कवर २४ कोटी खर्च करून कोलकत्ता कशी फायद्यात ठरली? हे सगळंच आपण थोडक्यात समजून घेणार आहोत, नमस्कार मी उद्धव नहाटे आणि तुम्ही पाहताय लगावबत्ती. व्हिडीओच्या सुरुवातीलाच एक आठवण म्हणून, तुम्ही जर अजूनही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल, तर आत्ताच सबस्क्राईब करा, जेणेकरून असे व्हिडीओ सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहोचतील.
आयपीएल 2024 चा अंतिम सामना खेळला गेला तो हैदराबाद आणि केकेआर यांच्यात. विशेष म्हणजे हे दोन्ही संघ गुणतालिकेमध्ये टॉपला होते, त्यामुळे सामना अटीतटीचा होणार, हे नक्की होतं. त्यात ऑस्ट्रेलियाला विश्व विजेते बनवलेल्या पेट कमिंगसला हरवणं म्हणजे अगदी वर्ल्डकप जिंकण्यासारखंच होतं आणि त्यात त्याच्यासमोर होता कोलकात्त्याचा भारतीय युवा कर्णधार श्रेयस अय्यर. पण कमिंगसला यावेळी माहिती नव्हतं की श्रेयस अय्यर जरी समोर असला तरी त्याच्या मागे उभा होता तो गौतम गंभीर.
नाणेफेक जिंकून कमिंग्सने बॅटिंग करायचं ठरवलं, नियोजन होतं की सुरुवातीला मोठ्या धावांचा लक्ष द्यायचं आणि नंतर केकेआरला फायनलच प्रेशर आणून मॅच काढून घ्यायची, पण डाव इथच फसला, नेहमीप्रमाणे फलंदाजीची सुरुवात करण्यासाठी अभिषेक शर्मा आणि ट्रेविस हेड ही जोडी आली आणि रिकामी हाताने परतली. इथं ज्या IPL लिलावात मिचेल स्टार्कवर २४ कोटी दिले म्हणून kkr ला ट्रोल केलं गेलं, त्याच स्टार्कने पहिल्याच षटकात लाखमोलाचं काम केलं. अभिषेख शर्माला बाद करत हैद्राबादला मोठा धक्का दिला. वैभव अरोरा, हर्षित राणा, वरून चक्रवर्ती, सुनील नरेन आणि आंद्रे रसेल यांच्या गोलंदाजी पुढे हैदराबादच्या बड्या बड्या दिग्गजांनी नांग्या टाकल्या.
दुसरीकडे मात्र हैद्राबादचा कर्णधार पॅट कमिन्स एकाकी झुंज देत होता, शेवटी त्यानेसुद्धा गुडघे टेकले आणि 113 धावांवर पूर्ण हैद्राबाद संघ तंबूत परतला. आता या 113 धावा म्हणजे आयपीएलच्या इतिहासातलं अंतिम सामन्यातील सर्वात कमी लक्ष होतं. त्यामुळे इथे सुरुवातीलाच केकेआरला अॅडव्हांटेज मिळालं, केकेआरने अवघ्या १०.३ षटकांमध्ये 113 धावांचं लक्ष पूर्ण करत आयपीएलच्या इतिहासातली तिसरी ट्रॉफी आपल्या नावावर करुन घेतली. सुरुवातीपासूनच चर्चेत असलेल्या व्यंकटेश अय्यरने तुफानी बॅटिंग करत अर्धशतक ठोकत केकेआरचा विजय सोप्पा केला होता. व्यंकटेश अय्यरसोबत गुरबाझनेही ३९ धावांची खेळी केली. आतापर्यंत चांगली कामगिरी करत असलेल्या हैद्राबाद गोलंदाजांना कमी लक्ष असल्यामुळे काहीच करता आलं नाही. त्यामुळे कोलकात्त्याला विजय सहज मिळाला.
या सगळ्यामध्ये केंद्रबिंदू ठरला तो गौतम गंभीर. कारण विजयात सर्वात मोठा वाटा होता, तो ड्रेसिंग रूममध्ये शांतपणे बसलेल्या गौतम गंभीरचा, गंभीर जिथे बसतो तिथे चर्चा नेहमीच असते. मोठमोठ्या विदेशी प्रशिक्षकांना घेऊन बाकी संघ मजबूत वाटतात खरे, पण इथं एक गोष्ट आवर्जून सांगावी लागेल ती म्हणजे कोलकत्याच्या कोचिंग स्टाफमध्ये फक्त एकच परदेशी प्रशिक्षक होता. ज्यात मुख्य प्रशिक्षक चंद्रकांत पंडित, सहप्रशिक्षक अभिषेख नायर, गोलंदाजी प्रशिक्षक भारत अरुण आणि एकमात्र विदेशी क्षेत्ररक्षक प्रशिक्षक रायन डोशेट. या सगळ्यांमध्ये लखनौ संघातून केकेआरमध्ये आलेल्या गौतम गंभीरला मेंटॉर म्हणून जबाबदारी दिली होती. गंभीर आला तेव्हाही चर्चेचा विषय बनला होता, गौतम गंभीर जेव्हा दोन वर्षे लखनौच्या ड्रेसिंग रूममध्ये बसायचा, तेव्हा तेव्हा दोन्हीवेळा लखनौचा संघ अंतिम चारमध्ये गेला होता. तर त्यातली एक वेळ लौखनौने फायनलपर्यंत मजल मारली होती.
लखनौच्या पूर्वी गंभीर जेव्हा दिल्ली संघासाठी काम करायचा तेव्हा दिल्लीने अंतिम सामन्यापर्यंत मजल मारली होती. सांगायचं काय आहे, तर गंभीर जिथं जातो तिथं त्याच्या नियोजनाने करेक्ट कार्यक्रम करतो. आता केकेआरबद्दल बोलायचं झाल्यास १० वर्षांपूर्वी जेव्हा विजेतेपद पटकावलं होतं, तेव्हाही गंभीरच कर्णधार होता, आता इतिहासाची तब्बल १० वर्षांनी पुनरावृत्ती करत पुन्हा कोलकात्त्याने विजेतेपद पटकावलं. त्यात सुद्धा गंभीरच महत्वाचा वाटा आहे. श्रेयश अय्यरला मैदानाबाहेरून गोलंदाजीत बदल करणं असो की मग सुनील नरेनला फलंदाजीसाठी सलामीला पाठवणं असो, गंभीरच बाहेरून संघ चालवणं गेमचेंजर ठरलं. अय्यर प्रेशरमध्ये आला की गंभीर त्याच्या पाठीमागे उभा असायचा. सांगायचं काय, तर गंभीर जिथे जातो, तिथे सगळी टीम खंभीर असते. या सगळ्यामुळे २०२४ ची IPL जरी केकेआर जिंकली असली, तरी चर्चा झाली ती गंभीरचीच.