Lagavbatti

day, 00 month 0000

वाचाल तर कळेल!

कुर्बानीच्या बकऱ्याचे दात प्लॅस्टिकचे? पाकिस्तानात नेमकं चाललंय काय?

बकऱ्याचे प्लस्टिक चे दात

सध्या पाकिस्तानमध्ये एका गोष्टीची जोरदार चर्चा सुरु आहे, ती म्हणजे कुर्बानीच्या बोकडाचे दात प्लॅस्टिकचे. पाकिस्तानातील कराचीच्या गुलबर्ग चौरंगी परिसरातील ही घटना आहे. अटक करण्यात आलेला व्यापारी, मूळचा हैदराबादचा, पण कराचीमध्ये तो ईदसाठी लागणाऱ्या बोकडांची विक्री करत होता; पण जास्त किंमत मिळावी म्हणून त्याने चक्क त्याच्या जवळच्या सर्व बोकडांना प्लॅस्टिकचे दात लावले होते. त्याने असं का केलं असेल? (Pakistan Bakra Eid)

इस्लामिक कॅलेंडरनुसार, 17 जून रोजी ईद उल-अजहा म्हणजेच बकरी ईद साजरी केली जातेय. जगातील काही भागांमध्ये बकरी ईद 16 जून रोजीच साजरी केली गेली. इस्लाम धर्मात या दिवशी बकऱ्याचा बळी देण्याची परंपरा असते. आता प्लॅस्टिकचे दात लावण्याची वेळ त्या व्यापाऱ्यावर का आली असेल? (Goat With Plastic Teeth in Karachi)

इस्लाम धर्मात एका वर्षात दोन ईद साजऱ्या केल्या जातात. एकाला गोडी ईद आणि दुसऱ्याला बकरी ईद म्हणतात. ईद म्हणजे आपलं कर्तव्य पार पाडण्याचा आणि इश्वरावर विश्वास ठेवण्याचा सण असतो. बकरी ईदच्या दिवशी बोकडाचा बळी दिला जातो. बकरी ईदला कुर्बानी देणाऱ्या बकऱ्याचे दात मोजले जातात. फक्त एक वर्षाच्या बोकडाचाच बळी मान्य केला जातो, अशी आख्यायिका आहे. एकदम लहान किंवा एकदम मोठ्या बोकडाचा बळी दिला जात नाही. बोकडाला दोन, चार किंवा सहा दात असतील तरच त्याचा बळी दिला जातो. नवीन जन्मलेल्या किंवा जुन्या बोकडांचा बळी दिला जात नाही, इतकंच काय, तर बोकडाला दातच नसतील किंवा बोकडाला दोन, चार किंवा सहा दातांपेक्षा वेगळ्या आकड्यात दात असतील, तर त्याचाही बळी दिला जात नाही. (eid al adha goat teeth are counted on bakrid before sacrifice)

पाकिस्तानमधील व्यापाऱ्याने अशाच प्रकारची शक्कल लढवली. ज्या बोकडांना एक, तीन किंवा पाच दात असतील, तर त्याचे दोन, चार किंवा सहा दात करणे आणि त्यांना विकणे, असा व्यवसाय त्या व्यापाऱ्याने सुरु केला होता. परिणामी त्याची ही गोष्ट इतर व्यापाऱ्यांच्या लक्षात आली आणि पोलिसांनी त्याला अटक केली.

Scroll to Top