महाराष्ट्रात लोकसभा निवडणुकीचं एकूण पाच टप्प्यात मतदान पार पडलं. आता सगळेजण ४ जुनची म्हणजेच निकालाची वाट पाहत आहेत. पूर्व विदर्भात (East Vidarbha) नागपूर (Nagpur Loksabha), रामटेक (Ramtek Loksabha), चंद्रपूर (Chandrapur Loksabha), गडचिरोली (Gadchiroli LOksabha) आणि भंडारा-गोंदिया (Bhandara-Gondiya Loksabha) या पाच मतदारसंघाचा समावेश होतो. गेल्या दोन निवडणुकांच्या तुलनेत यावेळच्या पूर्व विदर्भातील निवडणुकीत चित्र वेगळं आहे. यंदा पाचही ठिकाणी थेट लढत पार पडली आहे. भाजप आणि काँग्रेस या दोघांसाठी सगळ्याच जागा या महत्वाच्या आहेत. म्हणूनच पूर्व विदर्भातल्या ५ जागांचा निकाल काय असू शकतो, हेच आपण या व्हिडीओच्या माध्यमातून पाहणार आहोत.