बायोगॅसमध्ये कोणते वायू असतात, तर मिथेन, कार्बन डायऑक्साइड, हायड्रोजन आणि हायड्रोजन सल्फाइड. याच्यातून निर्माण झालेला वायू जेव्हा ऑक्सिजन आणि आगीच्या संपर्कात येतो, तेव्हा तो पेट घेतो, अशी साधी रचना जरी बायोगॅसची तुम्हाला वाटत असली, तरी तितकीच ती घातक आहे. जसा त्या डोममधून गॅस नळीवाटे आपल्या स्वयंकापगृहात पोहचतो, तशाच प्रकारची स्लरी दुसऱ्याबाजूने डोमच्या बाहेर पडत असते. त्या स्लरीचं पुढे काय करायचं, तर काही लोक त्याची उघड्यावर साठवनूक करतात, आणि इथेच मोठा घोळ होतो. या स्लरीची साठवणूक करुन अनेकजण शेतामध्ये त्याचा खत म्हणून वापर करतात, पण जिथे ही स्लरी साठवली जाते, त्या जागेला अनेकजण उघड्यावरच ठेवतात. या स्लरीमध्ये नायट्रोजन आणि फॉस्फरसचं प्रमाण भरपूर असतं, त्यामुळे एखादा ऑक्सिजनवर जगणारा जीव त्यामध्ये पडला किंवा बुडाला तर त्याची जगण्याची शक्यता फार कमी असते, असंच काहीसं घडलंय अहमदनगरच्या नेवासा तालुक्यातील वाकडी या गावात. स्लरी साठवलेल्या २०० फुटाच्या विहरित एक मांजर पडली, त्या मांजरीमुळे इतर सहाजण त्या विहिरीत उतरले, आणि त्यातला फक्त एकटाच जिंवत परत आला, ही घटना नेमकी कशी घडली, हेच आपण या व्हिडीओच्या माध्यमातून पाहणार आहोत.