Lagavbatti

day, 00 month 0000

वाचाल तर कळेल!

Budget of Maharashtra: अजित पवार यांनी महाराष्ट्राच्या विधानसभेत अर्थसंकल्प सादर केला.

Budget of Maharashtra

महाराष्ट्राचे अर्थमंत्री अजित पवार यांनी महाराष्ट्राच्या विधानसभेत अर्थसंकल्प सादर केला. यंदाच्या म्हणजेच २०२४ विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर हा अर्थसंकल्प सादर केला आहे. सादर केलेल्या अर्थसंकल्पात महिला व मुली, शेतकरी, तरुण मुलं व मुली यांच्यासाठी वेगवेगळ्या योजना सांगितल्या आहेत. त्याचबरोबर शासनाने कोणत्या योजनांसाठी किती निधी देऊ केला आहे त्याबद्दल देखील सांगितले. विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर अर्थसंकल्प सादर केल्याने या अर्थसंकल्पाकडे सगळ्यांच लक्ष लागलं आहे. अजित पवार यांनी ज्या योजनेबद्दल माहिती दिली त्या योजना पाहुयात.

महिला व मुलींसाठी असणाऱ्या योजना –

१) मुलींना 100 टक्के मोफत शिक्षण

२)राज्यात 10 हजार महिलांना पिंक रिक्षा खरेदीसाठी प्रति १० हजार रुपये

३)मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना लागू करणार

४)मुलींना शिक्षण व परीक्षा शुल्क माफ

५)विवाहीत मुलींसाठी शुभमंगल योजना

६)मुलींना व्यावसायिक कोर्सेससाठी १००टक्के शुल्क सवलत…२ लाख ५ हजार मुलींना लाभ मिळेल. २ हजार कोटींचा भार सरकार उचलेल.

७)अहिल्यादेवी होळकर स्टार्टअप योजना महिलांसाठी केली जाईल.

८)२१ ते ६० वयोगटातील महिलांना दरमहा १५०० रूपये दिले जातील. जुलैपासून योजना सुरू केली जाईल.

९)महिला आणि बालकांसाठीचे खटले चालवायला १०० जलद गती न्यायायलांना चालना देणार

१०)अंगणवाडी सेविका, मिनी अंगणवाडी सेविका, मदतनीस यांना १ लाख रु.लाभ

११) गर्भवती मातांचे आरोग्य व संस्थात्मक प्रसूती करता जननी सुरक्षा, योजना प्रधानमंत्री मातृ वंदना योजना राबवणार

१२)बचत गटाच्या माध्यमातून ग्रामीण महिलांचे सक्षमीकरण करणार

१३)बस प्रवासामध्ये सवलत, घर खरेदीसाठी मुद्रांक शुल्कात सवलत,

१४)कौटुंबिक समस्याग्रस्त महिलांच्या साठी शक्ती सदन योजना

१५)नोकरी करणाऱ्या महिलांसाठी व्यवसाय करातून सूट, महिला वस्तीगृहे, महिला केंद्रित पर्यटन धोरण

शेतकऱ्यांसाठी असणाऱ्या योजना

१)शेतकऱ्यांना मोफत वीज मिळावी यासाठी मागेल त्याला सौरऊर्जा पंप देणार

२)कापूस सोयाबीन उत्पादकांना हेक्टरी 5 हजार रुपये देणार

३)गाव तेथे गोदाम ही योजना राबवली जाईल

⁠४)ई-पंचनामा योजना राज्यात राबवणार

५)1 रुपयात पिक विमा योजना कायम करणार

६)⁠कांदा उत्पादकांना ३५० रु. प्रतिक्विंटल अनुदान

७)गाईचे दूध उत्पादकांना लिटर मागे 5 रुपये देणार

८)शेळी मेंढी पालन कुक्कुटपालनासाठी प्रोत्साहन योजना

९)सौर ऊर्जा करण्यासाठी 4 हजार दोनशे कोटींचा निधी

१०)जलयुक्त शिवार साठी 650 कोटींच्या निधीची तरतूद

११)उपसा सिंचन योजनेचा सौरऊर्जीकरण

१२)पडीक जमिनींवर बांबू लागवड

१३)सिंचन प्रकल्पांसाठी नाबार्डकडून १५ हजार कोटींचे कर्ज मंजूर

१४)राज्यातल्या 108 सिंचन प्रकल्पांना सुधारित मान्यता

१५)महाराष्ट्रातील ७६ हजार २०० कोटी किंमतीच्या वाढवण बंदर प्रकल्पाला मंजुरी

विद्यार्थी व तरुणवर्गासाठी असणाऱ्या योजना –

१)AI संशोधनासाठी विद्यापीठांना १०० कोटींचा निधी

२)⁠मुख्यमंत्री युवा कार्यप्रशिक्षण योजना राबविणार

३)⁠१० लाख तरुणांना रोजगार प्रशिक्षण

४)⁠विविध ठिकाणी मेडिकल कॉलेज उभारणार

⁠५)म्हसळा येथे युनानी महाविद्यालय सुरू करणार

⁠६)बालकांच्या पोषणासाठी अब्दुल कलाम पोषक आहार योजना

⁠७)सिंधुदुर्ग येथे स्कुबा डायव्हिंग केंद्र सुरू करणार

⁠८)खुल्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांना परदेशी शिक्षणासाठी शिष्यवृत्ती

९)शासनाच्या योजनेची माहिती जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी दरवर्षी 50 हजार युवकांना कार्य प्रशिक्षण देण्यात येईल

१०)जागतिक बँक सहाय्यक 2307 रुपये किमतीच्या मानवी विकासासाठी उपयोजित ज्ञान आणि कौशल्य विकास प्रकल्पांतर्गत 500 औद्योगिक प्रशिक्षण संस्थांची दर्जा वाढ

११)मॉडेल, आयटीआय, जागतिक कौशल्य केंद्र, डेटा सेंटर अशा संस्थांचे बळकटीकरण विकास कार्यक्रम राबवणार

 

युनेस्कोकडे नामांकनासाठी या 4 गोष्टींचा प्रस्ताव पाठवणार

१)शिवकालीन 12 गडकिल्ले

२)पंढरपुर वारी

३)गणेशोत्सव

४)दहीहंडी उत्सव

 

दिव्यांगांसाठी असणाऱ्या योजना

१)आनंद दिंघे घरकूल योजना

२)⁠दिव्यांगाना इलेक्ट्रिक वाहने देण्यासाठी योजना

३)⁠विधवा, दिव्यांग, वृद्धांचे अनुदान १ हजारहून दीड हजार केले

Scroll to Top