Apple चा 2026 मधील पहिला मोठा इव्हेंट: स्वस्त मॅकबुक ते iPhone 17e पर्यंत मोठे सरप्राईज!

टेकप्रेमींसाठी 4 मार्च खास ठरणार आहे. Apple ने 2026 मधील आपल्या पहिल्या मोठ्या कार्यक्रमाची घोषणा केली आहे आणि यावेळी लक्ष आहे ‘बजेट मॅकबुक’, नवीन ‘iPhone 17e’ आणि ‘AI फीचर्स’वर. विशेष म्हणजे, न्यूयॉर्कसोबत लंडन आणि शांघायमध्येही प्रेस इव्हेंट्स असतील. म्हणजेच, हे फक्त लॉन्च नाही तर प्रत्यक्ष अनुभव देणारा कार्यक्रम असणार आहे.

₹70-80 हजारांत मॅकबुक

Apple पहिल्यांदाच मॅकबुकमध्ये ‘M’ सिरीजऐवजी आयफोनमध्ये वापरली जाणारी ‘A’ सिरीज चिप देऊ शकते. म्हणजेच, बॅटरी लाइफ जास्त आणि रोजच्या वापरासाठी योग्य परफॉर्मन्स. मात्र 4K व्हिडिओ एडिटिंगसारख्या अवघड कामांसाठी हे ‘M’ सिरीजइतकं शक्तिशाली नसेल. पिवळा, हिरवा आणि निळा लोगो पाहता लॅपटॉप तेजस्वी रंगांत येण्याची शक्यता आहे. हे विशेषतः विद्यार्थी आणि ऑफिस वापरकर्त्यांना लक्षात घेऊन डिझाइन केले जाऊ शकते.

iPhone 17e: बजेटमध्ये प्रीमियम फीचर्स

iPhone 17e हा बजेट लाइनअपमधील नवीन फोन असू शकतो. यात iPhone 17 मधील A19 चिप मिळण्याची शक्यता आहे, जी जुन्या मॉडेलपेक्षा वेगवान असेल.
•6.1 इंच OLED डिस्प्ले
•पहिल्यांदाच MagSafe चार्जिंग सपोर्ट
•भारतात अंदाजे ₹60 हजारांपासून किंमत

iPad आणि Display अपडेट

iPad Air ला M4 चिपसह अपडेट मिळू शकतो. तसेच 12व्या जनरेशनचा बेस iPad पहिल्यांदाच ‘Apple Intelligence’ (AI) सपोर्टसह येऊ शकतो. बराच काळ प्रलंबित असलेले Studio Display चे नवीन व्हर्जनही सादर होण्याची शक्यता आहे.

Apple Intelligence अंतर्गत सिरी अधिक स्मार्ट होणार आहे. वापरकर्त्यांच्या प्रश्नांना अधिक अचूक आणि संदर्भानुसार उत्तरे देण्यावर भर असेल.

A-Series vs M-Series नेमकं काय?

A-Series चिप (जी आयफोनमध्ये वापरली जाते):
•बॅटरी लाइफ जास्त
•हलकी व रोजच्या कामांसाठी योग्य
•किंमत कमी ठेवण्यास मदत
M-Series चिप (जी मॅकमध्ये वापरली जाते): •प्रोफेशनल कामांसाठी जास्त शक्तिशाली
•4K/8K व्हिडिओ एडिटिंग, कोडिंग, ग्राफिक्स डिझाइनसाठी उत्तम
•मल्टीटास्किंगमध्ये भारी परफॉर्मन्स

म्हणजेच, जर नवीन मॅकबुकमध्ये A-Series आली, तर स्मार्ट आणि बजेट-फ्रेंडली”पर्याय असेल. पण जर तुम्ही प्रो-लेव्हल काम करत असाल, तर M-Series अजूनही पहिली पसंती राहील.

More From Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You May Also Like

मुंबई–नवी मुंबई मेट्रोलाइनला मंजुरी! 2 एअरपोर्ट जोडणारा हा गेमचेंजर प्रोजेक्ट

आज मुंबई-नवी मुंबईसाठी एक खूप मोठी आणि दिलासादायक बातमी आली, ती म्हणजे मंत्रीभूत पायामंडळ समितीने…