२०२३ चा वर्ल्ड कप हरल्यानंतर T20 World Cup मध्ये भारतीय संघाकडून जास्त अपेक्षा ठेवल्या नव्हत्या, पण ज्यांनी भारतीय संघाच्या विजयाच्या अपेक्षा ठेवल्या नव्हत्या, त्यांच्यासाठी भारतीय क्रिकेट संघानं चांगलंच उत्तर दिलंय. भारताने तब्बल १७ वर्षांनंतर टी २० वर्ल्ड कप साऊथ आफ्रिकेच्या हातातून निसटून आणला. राहुल द्रविड कोच असलेल्या भारताच्या टीमने टी२० वर्ल्ड कप जिंकला आणि कोचची कधीही न पाहिलेली रिऍक्शन सगळ्यांनी पाहिली. कालची मॅच बघून ग्राउंडवरच्या प्लेअरपासून घरी बसून बघत असलेला प्रत्येकजण रडला.