13 फेब्रुवारीला जागतिक रेडिओ दिन साजरा केला जातो. 2011 मध्ये UNESCO ने हा दिवस अधिकृतपणे घोषित केला.

रेडिओ हा आजही जगातील सर्वाधिक ऐकला जाणाऱ्या कम्युनिकेशन मेडीयमपैकी एक मानला जातो

निवडणुका, नैसर्गिक आपत्ती, युद्धस्थिती किंवा गंभीर बातम्या, अशा प्रत्येक वेळी रेडिओने लोकांपर्यंत फास्ट आणि रिलायबल माहिती पोहोचवली आहे. 

1895 मध्ये Guglielmo Marconi यांनी पहिला वायरलेस सिग्नल पाठवला आणि कम्युनिकेशन क्षेत्रात क्रांतीच घडली. 

1912 मधील RMS Titanic दुर्घटनेत SOS सिग्नलमुळे रेस्क्यू शक्य झाला.

1920 मध्ये अमेरिकेतील KDKA वरून पहिला व्यावसायिक रेडिओ प्रसारण झाला.

1923 मध्ये मुंबईच्या रेडिओ क्लबमधून भारतात पहिल्यांदा रेडिओ प्रसारण सुरू झालं. 

स्वातंत्र्याच्या काळात महात्मा गांधी यांनी देशवासीयांना रेडिओद्वारे संदेश दिले. 

1936 मध्ये ‘Indian State Broadcasting Service’ चे नाव बदलून All India Radio ठेवण्यात आले. 

1940-41 मध्ये दुसऱ्या महायुद्धादरम्यान Winston Churchill यांची भाषणं रेडिओवरून प्रसारित झाली.

1947 मध्ये स्वातंत्र्याच्या वेळी फक्त 6 स्टेशन होती. आज AIR चे 223 स्टेशन संपूर्ण देश व्यापतात.

1980 च्या दशकापर्यंत भारतात रेडिओ ठेवण्यासाठी लायसन्स आवश्यक होतं.

2013 च्या उत्तराखंड पुरावेळी स्थानिक कम्युनिटी रेडिओने नागरिकांना सुरक्षित स्थळांची माहिती दिली. 

2014-16 दरम्यान पश्चिम आफ्रिकेतील Ebola महामारीत रेडिओने अफवा थांबवून योग्य माहिती पोहोचवली.

 2025 पर्यंत भारतात 388 प्रायव्हेट FM स्टेशन 113 शहरांमध्ये कार्यरत आहेत (TRAI रिपोर्टनुसार).

आजही नरेंद्र मोदी ‘मन कि बात’ या कार्यक्रमातून कोट्यवधी लोकांपर्यंत पोहोचतात.

COVID-19 काळातही रेडिओने आरोग्यविषयक सूचना आणि सरकारी मार्गदर्शक तत्त्व लोकांपर्यंत पोहोचवली.